Posts

Showing posts from December, 2017

Unveiling the Untold: Surprising Facts about Gadar: Ek Prem Katha

  "Gadar: Ek Prem Katha" is a popular Bollywood film that was released in 2001. It starred Sunny Deol and Amisha Patel in the lead roles and was directed by Anil Sharma. The movie depicted a love story set against the backdrop of the Partition of India in 1947. While the film gained immense popularity, there are some lesser-known facts about "Gadar: Ek Prem Katha": 1. Historical Accuracy: Although "Gadar: Ek Prem Katha" is a fictional love story, it incorporated real historical events from the time of the Partition. The film portrayed the violent and tragic consequences of the Partition, highlighting the human cost and the struggles faced by people during that period. 2. Box Office Success: "Gadar: Ek Prem Katha" was a massive box office success and became one of the highest-grossing Bollywood films of all time at the time of its release. It held the record for the highest-grossing Hindi film until it was surpassed by "Dhoom 2" in 2006....

दिल चोरी सॉन्ग रिव्यु : यो यो हनी सिंह चा ठंडा कमबैक

Image
यो यो हनी सिंह च्या कमबैक चे सर्वेजन आतुरतेने वाट बघत होते. आणि असणारच कारण तो 2 वर्ष इंडस्ट्री पासून दूर होता. शेवटी तो क्षण आलाच लव रंजन चा नवीन चित्रपट 'सोनु के टीटू की स्वीटी' मधून. मग चला बघूया या रिव्यू.  यू ट्यूब वर हनी सिंह चे 'सोनु के टीटू की स्वीटी' चित्रपटातील 'दिल चोरी' हे गाणे रिलीज झाले. आणि ह्याच गाण्याचा टीज़र आधी खुप चर्चेत होता आणि आता फूल वीडियो सॉन्ग आले आहे. हे गाने हंस राज हंस चे लोकप्रिय 'दिल चोरी साडा हो गया' ह्याचे रीमेक वर्जन आहे, आणि हनी सिंह ने हे सॉन्ग रिक्रिएट केले आहे व गायले आहे खुद हनी सिंघ, सिमरन कौर आणि इशर्स ने. असे वाटत होते की हनी सिंह 2 वर्ष ने वापसी करतोय तर त्याचे गाने तडफदार असेल पन असे काही झाले नाही. ह्या सॉन्ग मधे हनी सिंह चा मैजिक फीका पडला आहे. त्याच्या फैंस ला हे गाणे आवडू शकते पण आधीचा तो हनी सिंह टच गायब आहे. सॉन्ग बद्दल बोलायला गेले तर हे गाणे कार्तिक नारायण, सिमरन भरुचा आणि सनी सिंग वर चित्रित केले आहे. आणि ह्या गाण्याचा वीडियो फार उत्तम आहे. फ़िल्म ची लीड हीरोइन नुसरत भरुचा ह्या सॉन्ग ...

देवा एक अतरंगी - अंकुश चा अतरंगी रीमेक

Image
बॉलीवुड मधे साउथ मूवीज च्या रीमेक चा सध्या खुप ट्रेंड चालू आहे. त्या मागोमाग आपली मराठी इंडस्ट्री ने देखील हा ट्रेंड फॉलो करायला सुरवात केली आहे, तो मग गाजलेला क्लासमेट असो किंवा फसलेला शटर, वृदांवन आणि आता त्यात भर पडली अकुंश चौधरी च्या  ' देवा एक अतरंगी ' या मराठी सिनेमाची. चला तर मग एक नजर टाकुयात 'देवा एक अतरंगी' वर.  देवा एक अतरंगी देवा हा चित्रपट ह्या आठवड्यात प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट मल्याळम चित्रपट चार्ली चा रीमेक आहे पण जसा त्या चित्रपटाने ने एक कल्ट स्टेटस फॉलो केला होता तसा देवा ह्या चित्रपटाला तो स्टेटस फॉलो करता आला नाही असे म्हणणे वावगं ठरणार नाही.  चित्रपटची सुरुवात होते माया देशमुख (तेजस्विनी पंडित), एक प्रसिद्ध लेखिकेपासून, जी आपले दूसरे पुस्तक लिहण्याच्या तयारीत आहे पण तिला विषय सापडत नाही. तेव्हा तिला तिच्या एका मित्रा कडून सल्ला मीळतो की तू कोंकण ला जा तुला नवीन विषय सूचतील आणि त्या दरम्यान तिची आई तिचे लग्न ठरवते त्यामुळे ती घरातून पळून कोंकण ला जाते, आणि तिथे ती एका घरात राहते जे एका आर्टिस्ट चे घर आहे आणि त्याने आपले घर पूर्णप...

टायगर जिंदा है रिव्यू: सलमानची ब्लॉकबस्टर डरकाळी

Image
सलमान खान चा 'टाइगर जिंंदा है' हा सिनेमा प्रदर्शित झाला. सलमान खानच्या फॅन्ससाठी  हे जणू एक न्यू इयर गिफ्टच म्हणावे लागेल. कतरीना कैफ आणि सलमान खान बऱ्याच काळानंतर एकाच चित्रपटात काम करताना आपल्याला दिसतील. सलमान कतरीना ची ऑफ स्क्रीन केमिस्टरी तर सर्वांच्या पसंतीची आहेच. पण आता इतक्या वर्षांनंतर त्यांची ऑन स्क्रीन केमिस्टरी तशीच आहे कि नाही याची झलक आपल्याला 'टाइगर जिंंदा है' चित्रपटात पाहायला मिळेल. चला तर मग पाहूया 'टाइगर जिंंदा है' चा रोमांचित करणारा रिव्यू.  टायगर जिंदा है चे पोस्टर  'टायगर जिंदा है' या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित कथा आहे. इराक मध्ये बंदी बनून ठेवलेल्या भारतीय परिचारकांची बचाव करण्यासाठी भारतीय आरएव्ही एजंट टायगर (सलमान खान) ची निवड केली जाते. आपण पहिले असाल तर 'एक था टायगर' मध्ये  SIS एजन्ट झोया (कतरीना कैफ) आणि RAW एजन्ट टायगर हे दोघेहि लग्न करून आपल्या आयुष्यात सुखी असतात. टायगर जिंदा है मध्ये त्यांना एक आपत्य (मुलगा) असते. त्यांचे मोहिमांवर प्रेम निवडण्याचे ठरविल्यापासून आठ वर्षे गेले आहेत. परंतु त्यांची य...

ठाकरे टीज़र रिव्यू: पुन्हा तोच ठाकरी अनुभव

Image
महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे हिन्दू हॄदय सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट लवकरच मोठ्या पडद्यावर 'ठाकरे' ह्या नावाने जीवंत होणार आहे.आधी ह्या चित्रपटाचा फर्स्ट लुक आला आणि नंतर टीजर लॉन्च झाला. कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी या चरित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे. चला तर मग त्यांच्या हया जीवनपटाचा टीजर कसा आहे हे जाणून घेऊया. ठाकरे थे फिल्म चे पोस्टर  टीजर ची सुरुवात अशी होते. लहान मुलाच्या रडन्याने आणि मग आगी ची सोडा बोटल त्या लहान मुलाच्या दिशेने येते, मग होतो एक स्फोट, तनावाचे वातावरण, रस्त्यावर रक्ताचे सड़काप, आजान चा आवाज़, एक माणूस नमाज़ करताना दिसतो आणि मग एक तड़केदार घोषनबाजी "हिन्दुस्थान के महानेता, सरसेनापति बाळासाहेब ठाकरे ज़िंदाबाद" आणि आपल्याला दिसतात बाळासाहेब ठाकरे (नावाजुद्दीन सिद्दीकी) नमस्कार करताना आपल्या प्रिय जनतेला.   ह्या मूवी चा टीज़र आपल्याला त्या काळाची आठवण करुण देतो. नवाजुद्दीन सिद्दीकी  बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या भूमिकेत एकदम कडक वाटतो, नवाजुद्दीनने बाळासाहेबांच्या...

आय्यारी ट्रेलर रिव्यु : ट्रिकी आणि इंटरेस्टिंग आय्यारी

Image
26 जानेवरी 2018 बॉक्स ऑफिस साथी जजमेंट डे असणार कारण अक्षय कुमार आणि नीरज पांडे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या आधी सुधा वेगवेगळ्या फिल्म्स मधून आपल्याला निराजच्या दिग्दर्शनचा प्रत्येय आला आहे. पण यावेळी अक्षय चा पैड मैन आणि नीरज पांडे चा आय्यारी एकाच दिवशी रिलीज होणार आहेत आणि ह्याच आय्यारी चा ट्रेलर रिलीज झाला आहे. आणि ट्रेलर एकदम ट्रिकी असला तरी मनोरंजक आहे. तर चला मग जाणून घेऊया आय्यारी चा ट्रेलर कसा आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज बाजपेयी मेजर जय बक्षी (सिद्धार्थ मल्होत्रा) हा ऑर्मी ऑफिसर आहे आणि देशासाठी तो काहीही करू शकतो पण, Surveillance च्या दरम्यान तो अश्या काही गोष्टी ऐकतो त्यामुळे त्याचा आर्मी वरुन विश्वास उडतो आणि तो पैसे कमवायचे ठरवतो आणि देशाशी गद्दारी करतो आणि त्याला रोकण्याचे काम भेटते कर्नल अभय सिंह म्हणजेच मनोज बाजपेयी ला. आणि हयात एक इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की, सिद्धार्थ मनोज बाजपेयी ला आपला गुरु मानतो. तर मग सुरु होते जय बक्षी ला पकडायची शोध मोहिम. तर जय बक्षी ला पकडायला अभय सिंह ला यश भेटेल का? आणि जय बक्षी देशा बरोबर गद्दारी का करतो??...

हिचकी ट्रेलर रिव्यु : रानी ची दमदार हिचकी

Image
2014 मधे आलेला ' मर्दानी' ची कडक ऑफिसर रानी मुखर्जी, हिचकी ह्या चित्रपटाटून आता आपल्या अभिनयाची उचकी देणारी  स्कूल टीचर बनून आपल्याला दिसणार आहे. हो रानी मुखर्जी ची कमबैक मूवी " हिचकी" चा ट्रेलर आला आणि ट्रेलर खुप  प्रभावीत करणारा आहे. तर चला मग जाणून घेवूया की रानी ची हिचकी कशी असेल. हीचकी चित्रपटातील रानी मुखर्जी नैना माथुर ( रानी मुखर्जी) हिला शिक्षिका बनायचे आहे पण तिला Tourette syndrome नावाचा एक आजार आहे, या आजारात तिला उच्चक्या येत असतात. मजेशिर बाब अशी की तिला ह्या उचकी मुळे बराच त्रास होतो, तिच्या ह्या उचक्यांनमधुन वेगवेगळे आवजांची निर्मिति होत असते. आणि ह्या मुळे तिला शिक्षिका चा जॉब भेटायला खुप त्रास होतो,खुप स्कूल मधून ती रिजेक्ट होते आणि शेवटी तिला जॉब भेटतो ते पन 14 मुलाना शिकवायचा जी खुप आगाव असतात आणि त्यांना कोणते पन शिक्षक तैयार होत नाही शिकवायला, त्या मुलाना शिकवयचे काम रानी ला भेटते आणि त्यांना शिकवताना रानी ला जो त्रास होतो ते खुप मजेशिर रीतीने दाखविले आहे. पन ती हार मानत नाही आणि त्या वर ती मात पन देते. पुढे काही इमोशनल सीन पन येतात की...

पॅड मॅन ट्रेलर रिव्यु: सच्चा सुपर हिरो

Image
आज हि अनेक लोकं सॅनिटर नॅपकिन सारख्या संवेदनशील आणि महिलांशी निगडित अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणं टाळतात. मग अश्या विषयांना हाताळावे तरी कसे ? हा पडलेला सर्वात मोठा प्रश्न आजचं प्रदर्शित झालेल्या पॅड मॅन या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये पॅड मन आपल्याला सोडवताना दिसेल. चला तर जाणून घेऊयात या ट्रेलर विषयी.  पॅड मनच्या या ट्रेलरची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने होताना दिसते. अमेरिकेत सुपरमॅन, स्पायडरमन, बॅटमॅन, आहे तर इंडिया मध्ये पॅड मॅन आहे.  पॅड मॅन च्या जर्नीची सुरवात होते अशी होते कि तो नवनवीन गोष्टी निर्माण करत असतो, आणि त्याची पत्नी (राधिका आपटे) हि त्याची साथ देत आपल्या आयुष्याचा गाढ पुढे नेत  असते. एके दिवशी पॅड मॅन सॅनिटर नॅपकिन स्वतः तयार करतो. हे तयार केलेले नॅपकिन्स तो स्वतः वापरतो आणि महिलांना होणाऱ्या पाळीच्या दिवसां मधला अनुभव स्वतः घेण्याचा प्रयत्न करतो. पुढे तो हे नॅपकिन्स विकतो हि.  ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जो त्रास त्याला  सहन करावा लागतो, ज्या हाल अपेष्ठा होत असतात, त्या अतिशय गमतीशीर रित्या मांडण्याचा प्रय...