जुमान्जी वेलकम टू दी जंगल हा 1995 ची जुमान्जी चा पुढचा भाग आहे. आणि ट्रेलर पाहुन सर्वाना ह्या मूवी ची प्रतीक्षा होती, Dwyne Jhonson ह्या मूवीत असल्यामुळे आपण खुप उत्साहित झालो होतो. तर चला मग सुरुवात करूया ह्या मूवी च्या रिव्यु ला.
चित्रपटाची सुरुवात होते 1996 पासून, जेव्हां एलेक्स नावाच्या एका मुलाला एक बोर्ड गेम बीच वर मिळतो. पन अचानक एलेक्स गायब होतो आणि तो बोर्ड गेम विडिओ गेम मधे रूपांतरित होतो. त्या घटनेच्या 20 वर्षा नंतर, चार हाइस्कूल स्टूडेंट्स (2 मुले, 2मूली) त्यांच्या ग़ैरव्यवहारा बद्दल शिक्षा मिळते. आणि स्कूल चे प्रिंसिपल त्यांना स्कूल ची बेसमेंट साफ करायला सांगतात. साफसफाई करताना त्यांना जुमान्जी नावाचा विडिओ गेम कैसेट सापडते, जो 5 प्लेयर चा गेम आहे त्यात एक प्लेयर unaccesible असतो, मग ते चार स्टूडेन्ट्स गेम मधील हर एक पात्र सेलेक्ट करतात आणि गेम चालू होताच चार ही जन त्या गेम च्या आत जातात आणि फसतात. मजेदार गोष्ट अशी की चार ही मुले मोठी होतात आणि त्या गेम चे चार पात्र बनतात आणि त्या मधे 1 मुलगी (Bethany) जी स्वताला हॉट समजत असते ती जाड़ा मुलगा बनते, स्पेसर जो सुकडा असतो तो मस्क्युलर (Dwyne Jhonson) बनतो, जो ऊंच असतो (Fridge) तो ठेंगणा बनतो आणि जी आखड़ू मुलगी असते (Martha) ती एक सुदंर कमांडो बनते. त्या चौघाना लक्षात येते की ते लोग ह्या गेम मधे फसले आहेत आणि प्रत्येकाला 3 लाइफलाइन भेटल्या आहेत, जऱ त्या तिन्ही लाइफलाइन संपल्यात तर त्यांचा मृत्यु होईल. पण हर एक पात्रांमधे कही खास बाबी आहेत आणि वीकनेस सुद्धा आहेत. तर मग पूर्ण कथानक त्या चार पात्रांवर आधारित आहे. की ते ही मिस्ट्री कसे सोड़ावतात आणि त्याच्या ऑरिजिनल आवतरात येतात, तर अशी आहे मूवी ची स्टोरी.
जुमान्जी ची स्टोरी मजेदार आहे आणि डायरेक्टर जैक कसदन ने ओरिजनल स्टोरी ची थीम ठेवून अजुन नवीन ट्विस्ट टाकून मूवी ला एकदम इंटरेस्टिंग बनवले आहे. मूवी चा पहिला भाग खुप मजेदार आहे पन इंटरवल नंतर काही क्षणानंतर मूवी ची ग्रिप थोडी ढीली पड़ते पन हे आपल्याला जाणवत नाही कारन आपन मूवी मधे पूर्ण घुसलेलो असतो.तर चला मग जाणून घेऊया लीड कास्ट बद्दल.
Dwyne Jhonson एकदम सुपर्ब आहे. जे रोल तो करण्यात तो फेमस आहे तोच रोल डायरेक्टर ने दिला आहे. Kevin Hurt ची कॉमिक टाइमिंग एकदम सही आहे न त्याचे डायलॉग एकदम फनी आहे.Jack Black मूवी चा प्लस पॉइंट आहे, जी आधी हॉट मुलगी असते आणि ती एका फैट मानसात कन्वर्ट होते, त्याची एक्टिंग ज़बरदस्त आहे.Karen Gillan एकदम सुदंर दिसते आणि तिची एक्टिगं ठीक आहे.
ओवरआल जऱ तुम्ही क्लासिक जुमान्जी चे फैंस असाल तर तुम्हाला हा मूवी नक्की आवडेल.आणि जऱ तुम्ही आधीचा जुमान्जी पाहिला नसेल तर हा मूवी पहिल्यावर तुम्हाला आधीचा चित्रपट पाहायला मन करेल..
तर तुम्ही हा चित्रपट तुमच्या किड्स बरोबर पाहू शकता पन हा काही जोक्स एडल्ट्स आहे, तरीही जुमान्जी वेलकम टू दी जंगल ही एक न्यू ईयर ट्रीटच आहे.
Comments
Post a Comment